Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Goa › पणजीत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायदाविषयी आज परिषद : नाडकर्णी

पणजीत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायदाविषयी आज परिषद : नाडकर्णी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कायदा असोसिएशनच्या भारत शाखेकडून शुक्रवार दि. 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायदा या विषयावर अखिल भारतीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे अतिरीक्‍त सॉलिसिटर जनरल  अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी यांनी  पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

नाडकर्णी यांनी सांगितले, की कांपाल पणजी येथील हॉटेल मेरीयट मध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता भारताचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याहस्ते परिषदेचे  उद्घाटन होणार आहे. 

आंतरराष्ट्रीय कायदा असोसिएशनच्या भारत  शाखेचे सचिव अ‍ॅड. पी. एच. पारेख म्हणाले, की आंतरराष्ट्रीय कायदा असोसिएशन ही सर्वात जुनी कायदा संस्था असून तिची स्थापना 1873 साली झाली. दर दोन वर्षांनी  असोसिएशनतर्फे  परिषदेचे आयोजन केले जाते. 2020 साली टोकियो जपान  व 2022 साली पोर्तुगाल येथे या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यात आयोजित केल्या जाणार्‍या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अ‍ॅटर्नी जनरल व आंतरराष्ट्रीय कायदा असोसिएशनच्या भारत शाखेचे  के. के. वेणूगोपाल, सर्वोच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती  ए.के. सिकरी, अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल  अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी  हजर असतील.  

या परिषदेवेळी कायद्याचे नियम व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कायदा, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक व ग्राहक कायद्याचा विकास या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञांकडून यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे  यावेळी उपस्थित होते.

 

Tags : Panaji, Panaji news, Commercial Law, Conference 


  •