Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Goa › केपे मार्केट प्रकल्प त्वरित पूर्ण करा 

केपे मार्केट प्रकल्प त्वरित पूर्ण करा 

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:06PM

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

केपे आरोग्य केंद्राच्या इमारतीची 2007 साली पायाभरणी झाली. ही इमारत बांधून पूर्ण होऊन तशीच पडून आहे. आरोग्य केंद्र सुरू करण्याबरोबर केपे मार्केट प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण केले जावे, असे निवेदन केपे भाजप मंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांंना सादर केले.

केपे भाजप मंडळाने मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली या वेळी केपे शहर प्रमुख संदीप फळदेसाई, युवा कार्यकर्ते योगेश कुंकळकर, प्रताप फळदेसाई, फातोर्पा  उपसरपंच सेंजिल डिकोस्ता, प्रसाद फळदेसाई आणि रमेश वरक उपस्थित होते.

केपेतील सरकारी इस्पितळाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे.मात्र त्या ठिकाणी कोणत्याच सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.या सुविधा त्वरित उपलब्ध करून इस्पितळ सुरू करावे, असे  निवेदनात म्हटले आहे. केपेची मोडकळीला आलेली मार्केट इमारत मोडून नवीन इमारत बांधण्याचे  काम सुरू केले आहे त्यास गती दिली जावी. देऊळमळ  येथील  मोडकळीस आलेल्या शाळेचे काम ही जलद गतीने  केले जावे अशी मागणी निवेदनात केली आहे. भाजप मंडळाने कधीही केपेच्या विकासाला खो घातलेला नाही.उलट विकासकामे गतीने व्हावीत यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले आहेत, असे योगेश कुंकळकर म्हणाले.