Fri, Jul 19, 2019 23:20होमपेज › Goa › मंत्री मडकईकर यांच्या बंगल्याबाबत पुरातत्व विभागाकडे तक्रार दाखल

मंत्री मडकईकर यांच्या बंगल्याबाबत पुरातत्व विभागाकडे तक्रार दाखल

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 12:27AMपणजी : प्रतिनिधी  

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुने गोवे येथील कथित बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी  आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे  तक्रार दिली आहे.
मडकईकर यांच्या बंगल्या विरोधात करण्यात आलेल्या  तक्रारीची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पाठवण्यात आली आहे.  

अ‍ॅड.रॉड्रिगीस यांनी यापूर्वी सदर बंगल्याची फाईल जुने गोवे पंचायत कार्यालयातून गायब झाल्याप्रकरणी पंचायतीच्या  सरपंच जनिता मडकईकर,  वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व पंचायतीच्या सचिवांविरोधात  मागील आठवड्यात जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मडकईकर यांनी जुने गोवे येथील सर्व्हे क्रमांक 144/1 व 144/2 मध्ये त्यांची कंपनी निकीताशा रियल्टर्सव्दारे  बंगला बांधला आहे. सदर बंगला हा  बॅसिलिका ऑफ बॉम जिजस या वास्तूच्या 300 मीटर हद्दीत उभारण्यात आला आहे. या बंगल्याची संरक्षण भिंत या वास्तूपासून केवळ 50 मीटर अंतरावर आहे. सदर बंगला सर्व नियमांचे उल्‍लंघन करुन उभारण्यात आल्याचे रॉड्रीगीस यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

Tags :Complaint, filed with, Archeology Department, for Minister Madkikekar's, bungalow