Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Goa › तिसवाडीत अभियंत्याविरोधात तक्रार

तिसवाडीत अभियंत्याविरोधात तक्रार

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:35AMपणजी : प्रतिनिधी

तिसवाडी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करून तेथील रहिवाशांना दि.3 जून रोजी संपूर्ण दिवस विजेविना राहण्यास भाग पाडल्याबाबत  आम आदमी पक्षातर्फे (आप) मुख्य वीज अभियंत्याविरोधात  भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती  ‘आप’ चे पदाधिकारी प्रदीप पाडगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली. 

खंडित वीज पुरवठ्यास जबाबदार असलेल्या मुख्य वीज अभियंता व अन्य अधिकार्‍यांच्याविरोधात   एफआयआर नोंद करावा, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.  कदंब पठारावरील हाय टेन्शन लाईन बेकायदेशीरपणे हटवण्याच्या प्रयत्नात तिसवाडी तालुक्यातील वीज खंडित झाली. त्यामुळे नागरिकांना 24 तास  विजेविना रहावे लागले. त्यामुळे त्यांची बरीच गैरसाय झाली. सदर बाब भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपासासाठी योग्य ठरते.

याप्रकरणी ‘आप’कडून लवकरच वीज खात्याच्या अधिकार्‍यांविरोधात एफआयआरची मागणी करण्यासाठी जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.