Tue, Aug 20, 2019 15:26होमपेज › Goa › किनार्‍यांवरून ११ हजार टन कचर्‍याचे वर्षभरात संकलन

किनार्‍यांवरून ११ हजार टन कचर्‍याचे वर्षभरात संकलन

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:33AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

दृष्टी कंपनीकडून मागील एका वर्षात राज्यातील 37 समुद्र किनार्‍यांवरून एकंदर 11 हजार टन कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती या कंपनीने दिली आहे. किनारपट्टींवरील कचरा संकलनाचे कंत्राट सरकारने दृष्टी कंपनीस दि. 17 डिसेंबर 2016 रोजी दिले होते. कंपनीचे अधिकारी रवी शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील 16 व दक्षिण गोव्यातील 21 किनार्‍यांवरील कचरा गोळा करण्याचे सदर कंत्राट होते.  

गोवा हे पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असून विशेषतः समुद्र किनार्‍यांवर पर्यटक  मोठ्या संख्येने भेट देतात. पर्यटकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देेशाने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी दृष्टी कंपनीने किनारे स्वच्छतेसाठी अतिरिक्त यंत्रणा या कामी लावली आहे. रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कचरा गोळा केला जातो. यासाठी 322 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही रवी शंकर म्हणाले. कंपनीने दि. 17 डिसेंबर 2016 ते 17  डिसेंबर 2017 या कालावधीत 10 हजार 72 टन कचरा गोळा करण्यात आला. यात ओला व सुक्या कचर्‍याचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. 

किनार्‍यांवरील उचलण्यात येणारा हा कचरा थेट साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. या शिवाय दृष्टी कंपनीकडून किनारे स्वच्छतेसाठी नोव्हेंबर महिन्यापासून 150 दिवसांची ‘तेरा मेरा बीच’ ही जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. बागा, कळंगुट व मिरामार किनार्‍यांवर ही मोहीम राबवली जात असल्याचे रवी शंकर यांनी सांगितले.