Wed, Nov 21, 2018 21:57होमपेज › Goa › नारळाची श्रीलंकेतून आयात

नारळाची श्रीलंकेतून आयात

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 8:16PM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

नारळाच्या वाढलेल्या दराबरोबर नारळाच्या वाढत्या तुडवड्यावर उपाय काढण्यासाठी सरकारने आता श्रीलंकेतून  नारळ आयात करण्याचा विचार चालवला आहे, अशी माहिती  कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

श्रीलंकेतून किती नारळ आयात करावा यावर निंर्णय घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या विभागीय कृषी अधिकर्‍यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

कृषी खाते नारळ उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात नारळ खरेदी करून फलोत्पादन केंद्रावर उपलब्ध करते. परंतु सर्व लोकांच्या नारळाच्या गरजा भागू शकत नाहीत. लोकांना पूरक प्रमाणात आणि स्वस्तात नारळ उपलब्ध करून द्यायचा असेल तर श्रीलंकेतून नारळांची आयात करणे हा एकमेव पर्याय आहे. नारळ उत्पादकाकांकडून मोठ्या प्रमाणात नारळ खरेदी करून कोणत्याही एजन्सीशिवाय नारळ थेट लोकापर्यंत पोहोचविल्यास नारळाचे दर नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे, असे सरदेसाई म्हणाले. 

राज्यातील नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे आवश्यक पुरवठा होत नाही. गोमंतकीयांसाठी आता डीजे फार्म यांच्या कडून नारळ घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून हायब्रीड नारळाची झाडे खरेदी करण्याचा कृषी खाते विचार करीत असल्याचे सरदेसाई म्हणाले.