Sun, May 19, 2019 14:27
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › राज्यात ढगाळ हवामान

राज्यात ढगाळ हवामान

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात  शनिवारी  दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे   सकाळपासूनच कोरडे वातावरण जाणवत होते.  कोकणपट्ट्यात  ढगांचा पट्टा निर्माण झाल्याने  या आठवड्यात सलग दुसर्‍यांदा  ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे आंबा तसेच काजूच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता  शेतकर्‍यांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

पणजी वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार,  शनिवारी  कमाल तापमान 32 अंश सेल्सियस  व किमान तापमान 22 अंश सेल्सियस इतके नोंद झाले. राज्यात पुढील पाच दिवस   कोरडे हवामान राहणार असून  काही भागांमध्ये पावसाचा हलकासा शिडकावा होण्याची शक्यता व्यक्‍त  करण्यात आली आहे.

येत्या 48 तासांत कमाल तसेच किमान तापमानात घट अपेक्षित असून  कमाल तापमान 30 अंश सेल्सियस  व किमान तापमान 21 अंश सेल्सियस पर्यंत नोंद होईल, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. वातावरणात झालेल्या या अचानक बदलाची शेतकरी वर्गाने नोंद घ्यावी, असेही पणजी वेधशाळेने कळवले आहे.