Sun, Feb 24, 2019 08:32होमपेज › Goa › खनिज वाहतूक बंद करा

खनिज वाहतूक बंद करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील  खनिज मालाची वाहतूक बंद करण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी दिला. गोवा फाऊंडेशनने दाखल केलेल्या  अवमान याचिकेवर अंतिम  आदेश दिला जाईपर्यंत हा अंतरिम आदेश लागू  असेल, असेही न्यायालयाने  नमूद केले आहे. 

उच्च न्यायालयाने   सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 18 एप्रिलपर्यंत  तहकूब केली आहे. राज्यात 15 मार्च  संध्याकाळी 7 वाजल्यापासून  खाणबंदी लागू झाली. मात्र, 15 मार्चपूर्वी ज्या खाण कंपन्यांनी खनिज मालाचे उत्खनन  करून  हा खनिज माल  लीज क्षेत्राच्या बाहेर डंप  केला होता, त्या कंपन्यांना  या खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी खाण खात्याने  खाण बंदीनंतरही परवानगी दिली होती.  खनिज मालाच्या या वाहतुकीसाठी खाण कंपन्यांनी   खात्याकडे   रॉयल्टी स्वरुपात  शुल्क या आधीच जमा केले होते.

मात्र, या  खनिज मालाची वाहतूक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करून   त्याविरोधात   गोवा फाऊंडेशनने   उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी  न्यायालयाने   वरील अंतरिम आदेश दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने  राज्यातील 88 खाण लिजांचे   नूतनीकरण    करण्यात आलेले परवाने मागील महिन्यात दिलेल्या निवाड्यात रद्द केले होते. त्यामुळे  सध्या खाण बंदी लागू आहे. 

Tags : mineral transport, Close,  High Court Goa bench, order, goa news,


  •