Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Goa › बायथाकोल परिसरात पारपती यांची स्वच्छता मोहीम

बायथाकोल परिसरात पारपती यांची स्वच्छता मोहीम

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:16PMबोरी : वार्ताहर

बोरी बायथाकोल परिसरातील ‘बोरी-ढवळी  मार्गावरील बेटावर कच-याचे साम्राज्य’  या मथळ्याखाली  ‘पुढारी’त  प्रसिद्ध झालेल्या बातमीची  तातडीने  दखल घेऊन स्थानिक पंचायत सदस्य विनय पारपती यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन संपूर्ण बेट स्वच्छ केले.

गेले काही दिवस सदर ठिकाणी रात्री-अपरात्री काळोखाचा फायदा घेऊन कचरा टाकण्याचे प्रकार वाढले होते, या वर ‘पुढारी’ सचित्र बातमी प्रसिध्द   होताच स्थानिक स्वच्छता प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती व पंचायतीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणा-याना पकडण्याचे सूचित केले होते या प्रकरणी उपसरपंच काँस्टी लुईस यांनी स्वतः पाळत ठेवून कित्येकांना पकडले  व संपूर्ण परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कचरा, घरातील जुने टाकाऊ साहित्य तेथून हटवून परिसर स्वछ केला  होता.

मात्र त्यानंतरही  कचरा फेकण्याचा प्रकार सुरु होता.गेली काही वर्षे बोरी डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्य या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत होते. स्वत: कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत हल्लीच पंचायतीने ट्रस्टचे काम हाती घेऊन संपुर्ण बोरी गावातील कचरा गोळा करत आहे, तरी सुद्धा कचरा प्रकरण चालु आहे या कामी पंचायतीने दखल घेउन कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे स्वच्छता प्रेमीनी दै.पुढारी त बातमी प्रसिद्ध करून प्रकाश टाकल्या बद्दल  स्वागत करून पंच विनय पारपतीचे अभिनंदन केले आहे.