Wed, Sep 19, 2018 22:34होमपेज › Goa › राष्ट्रपतींचा आज नागरी सत्कार

राष्ट्रपतींचा आज नागरी सत्कार

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे  शनिवार (दि.7) पासून दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या  स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली असून   आज  त्यांचा नागरी  सत्कार  होणार आहे.

राष्ट्रपती कोविंद शनिवारी सकाळी गोव्यात दाखल होतील. ते राष्ट्रपती बनल्यानंतर प्रथमच गोवा दौर्‍यावर  येत  असल्याने त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. दोनापावला येथील एनआयओ सभागृहात  संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान  हा  कार्यक्रम होईल. 

तत्पूर्वी ते गोवा विद्यापीठाच्या दुपारी 12 वाजता होणार्‍या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहतील. ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा पदवीदान सोहळा होणार असून यावेळी राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाच्या कुलपती मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत.  

राष्ट्रपती कोविंद हे 8 रोजी जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिजस चर्चला तसेच मंगेशी मंदिराला भेट देतील. त्यांच्या दोन दिवसांच्या दौर्‍याच्या तयारीची जबाबदारी माहिती व प्रसिद्धी खात्याला देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमस्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.