Wed, Nov 21, 2018 19:22होमपेज › Goa › मुलांनी लॅपटॉप वापरून ज्ञानात भर घालावी

मुलांनी लॅपटॉप वापरून ज्ञानात भर घालावी

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 8:52PMकुंभारझुवे : प्रतिनिधी

आजच्या तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्याना सर्व माहिती उपलब्ध व्हावी   या उद्देशाने सरकार विद्यार्थ्यांना  लॅपटॉप देत आहे. विद्यार्थ्यांनी लॅपटॉप वापरून ज्ञानात भर घालून आपले  भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

खांडोळा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात  विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या लॅपटॉप वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गावडे बोलत होते. व्यासपीठावर सरपंच दिलीप नाईक, पालक व शिक्षक संघाचे अध्यक्ष जोएना शिरोडकर, उपाध्यक्ष संजीवनी आमोणकर, प्राचार्य नारायण नाईक, उपप्राचार्य गीतांजली परब, इन्फो कॉपोरेशनचे व्यवस्थापक सनीश वर्गीस तसेच अजय कामत  उपस्थित होते.

नारायण नाईक म्हणाले, की  विद्यार्थ्यानी त्याच्या शिक्षणासाठी लॅपटॉपचा योग्य  वापर करावा. विद्यार्थ्यानी शिकताना ध्येय समोर ठेवून शिकले पाहिजे. शिक्षणाने माणूस ज्ञानी बनून समाजात आदराचे स्थान निर्माण करू शकतो.  मंत्री गावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.