Mon, Jan 21, 2019 00:35होमपेज › Goa › मुख्यमंत्री आठ दिवसात गोव्यात

मुख्यमंत्री आठ दिवसात गोव्यात

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:41PMपणजी : प्रतिनिधी

अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 8 सप्टेंबर रोजी राज्यात परतणार आहेत. दिल्लीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 9 सप्टेंबर रोजी होणार्‍या बैठकीला ते  उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली.

पाटो येथे एका कार्यक्रमात आलेल्या तेंडुलकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले की, दिल्लीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून या बैठकीचे पर्रीकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्या बैठकीपूर्वी एक दिवस पर्रीकर राज्यात परतणार आहेत. 

राज्यात मुख्यमंत्री पदाची धुरा आणखी कुणाच्या हाती देण्याची सध्या आवश्यकता नाही. पर्रीकर हे स्वत: ही जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असून ते उत्तमरितीने ही जबाबदारी पेलत आले आहेत, असे तेंडुलकर यांनी नमूद केले.