Tue, Apr 23, 2019 09:39होमपेज › Goa › मुख्यमंत्री २७ जूनपर्यंत येण्याची शक्यता : श्रीपाद नाईक

मुख्यमंत्री २७ जूनपर्यंत येण्याची शक्यता : श्रीपाद नाईक

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMपणजी : प्रतिनिधी

अमेरिकेत उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते राज्यात परतणार आहेत. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर जूनच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात 27 जूनपर्यंत परतण्याची शक्यता आहे, असे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. येथील कला अकादमीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.  

भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांना राज्याच्या राजकारणात आणून  आगामी लोकसभेसाठी पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांना संधी देण्यात येणार असल्याचे वृत्त येथील एका वृत्तपत्रात (‘पुढारी’ नव्हे) प्रसिद्ध झाले आहे. त्याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आताच उमेदवारी निश्‍चित झालेली नाही व आश्‍वासनही देण्यात आलेले नाही. आपण केंद्रीय मंत्रिपद सोडून राज्याच्या राजकारणात परतणार असल्याच्या वावड्या असून, त्यात कोणतेही तथ्य नाही.