Fri, Apr 26, 2019 17:50होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार

मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

मुंबई येथील लिलावती इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (दि.29) राज्यात परतणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना मागील आठवड्यात मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अमेरिकेत काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते गोव्यात 23 ऑगस्ट रोजी परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा तब्येतीची तक्रार जाणवल्याने 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपचारांसाठी जावे  लागले होते. ते  बुधवार दि. 29 रोजी गोव्यात परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, केरळमधील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता  निधीसाठी जनतेने  मदत  करावी, असे आवाहन   मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले आहे. केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारकडून नवे खाते उघडण्यात आले आहे.

त्यानुसार नागरिकांनी  मुख्यमंत्री गोवा केरळ  रिलीफ फंडमध्ये मदत म्हणून रक्कम जमा करण्यासाठी  37896464050 या खाते क्रमांकावर स्टेट बँक ऑफ  इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोख स्वरूपात किंवा धनादेशाव्दारे रक्कम जमा करावी,असे कळवण्यात आले आहे.