Fri, May 24, 2019 06:47होमपेज › Goa › मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेला

मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेला

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:55PMपणजी : प्रतिनिधी

मुंबई येथील लिलावती इस्पितळातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारांसाठी मंगळवारी रात्री उशिरा अमेरिकेला  रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रूपेश कामत यांनी दिली. 

मुख्यमंत्री  पर्रीकर सोमवारी रात्री  मुंबईला लिलावती इस्पितळात दाखल झाले होते. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना तातडीने अमेरिकेला उपचारासाठी नेण्याचा  निर्णय घेतला. या निर्णयानुसार, पर्रीकर मंगळवारी रात्री उशिरा  दीड वाजण्याच्या सुमारास अमेरिकेला  रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर 4 ते 6 आठवडे राज्यात उपलब्ध नसतील. आपल्या आजारपणाबद्दल माहिती देऊन आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे दिला असल्याची माहिती  राज्यपाल मृदूला सिन्हा यांना दिली आहे. प्रशासकीय कारभार हाताळण्यास सुलभता यावी म्हणून ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.