होमपेज › Goa ›  मुख्यमंत्री पर्रीकर यांना दोन दिवसांत डिस्चार्ज

 मुख्यमंत्री पर्रीकर यांना दोन दिवसांत डिस्चार्ज

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMपणजी : प्रतिनिधी

 

मुंबई येथील लीलावती इस्पितळात उपचार घेणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सौम्य पॅनक्रिवा-टिटीसवर उपचार सुरू आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांना येत्या दोन दिवसांत इस्पितळातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आले आहे. त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली जाणार नाही. 

गोवा विधानसभेच्या सोमवार, दि. 19  पासून  सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  हे  उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्रीकर यांना  बुधवारी अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात  उपचार करण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुन्हा पोटदुखीची तक्रार केल्याने  त्यांना मुंबई येथील लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही पुत्र तसेच सुरक्षा कर्मचारी आहेत. 

पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीदेखील मुंबईला त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांकडूनदेखील ट्विटरद्वारे त्यांची तब्येत लवकरच सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.