Tue, Apr 23, 2019 00:27होमपेज › Goa › शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन

शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:55PMवाळपई : प्रतिनिधी

वाळपईतील छत्रपती शिवाजी महाराज  पालिका उद्यानात शिवजंयतीच्या निमित्ताने  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण  सोमवार  दि.19 फेब्रुवारी रोजी  होणार असून त्यानिमित्त    शुक्रवारी बेळगावमार्गे शिवपुतळ्याचे गोव्यात आगमन झाले. त्याचे शानदार स्वागत केरी-सत्तरी येथे करण्यात आले.  या स्वागत सोहळ्यात  शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

केरीतून भव्य मिरवणुकीने  पुतळा वाळपईतील पालिका उद्यानात आणण्यात आला. ही मिरवणूक केरी, मोर्ले, होंडा, पिसुर्ले या मार्गाने वाळपईत  आली. यात दुचाकी, चारचाकी वाहनाच्या माध्यमातून शिवप्रेमींनी भाग घेतला होता.

शिवजयंती उत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण समिती याच्या संयुक्त विद्यमाने सदर पुतळ्याचे अनावरण सोमवारी सकाळी9.30 समितीचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यासाठी समितीतर्फे पूर्वतयारी करण्यात आली असून उद्यानाची साफसफाई करण्यात आली आहे.  

वाळपई  शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा रहावा अशी येथील रहिवाशांच्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मागणीची पूर्तता करण्याचे आश्‍वासन वाळपईचे आमदार तथा आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी  दिले होते. त्याची पूर्तता यानिमित्ताने होत आहे. सगुण वाडकर,प्रसाद खाडीलकर, तुळशीदास प्रभू,रामनाथ डांगी, लक्ष्मण गावस,यांनीही  विचार मांडले. मिरवणुकीचे ठिकाठिकाणी नागरिकांनी व शिवप्रेमीनी फटाके वाजवून स्वागत केले तर अनेक ठिकाणी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.