Tue, Nov 13, 2018 05:56



होमपेज › Goa › विश्‍वजीत राणे अपात्रता प्रकरणी उच्च न्यायालय निवाड्याला आव्हान 

विश्‍वजीत राणे अपात्रता प्रकरणी उच्च न्यायालय निवाड्याला आव्हान 

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:05AM



पणजी : प्रतिनिधी

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याला प्रदेश काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी आव्हान दिले आहे. 

प्रदेश काँग्रेसने दाखल केलेली  अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने  11 ऑक्टोबर रोजी फेटाळून लावून आरोग्य मंत्री  राणे यांना दिलासा दिला होता. उच्च न्यायालयाच्या याच निवाड्याला जवळपास तीन महिन्यांनी काँग्रेसने आव्हान दिले आहे. 

आरोग्यमंत्री राणे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे मे महिन्यात  उच्च न्यायालयात ही अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. मार्च महिन्यात विद्यमान भाजप सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी काँग्रेसचे आमदार असूनही ते सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यांनी पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन केले नसल्याने त्यांना अपात्र ठरवावे, यासाठी काँग्रेसने न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली होती. राणे यांनी विश्‍वासदर्शक ठरावावेळी सभागृहात अनुपस्थित राहून  काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.