Mon, Jun 24, 2019 21:33होमपेज › Goa › साखळी पालिका निवडणूक; ७३ उमेदवारी अर्ज ग्राह्य

साखळी पालिका निवडणूक; ७३ उमेदवारी अर्ज ग्राह्य

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:26AMडिचोली : प्रतिनिधी

साखळी पालिका निवडणुकीसाठी  शनिवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून 73 उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आले असून अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारचा दिवस उमेदवारांकडे आहे. खास निवडणूक निरीक्षक म्हणून संध्या कामत यांच्या उपस्थितीत निर्वाचन अधिकारी प्रदीप नाईक, मधू नार्वेकर यांनी अर्जांची छाननी केली. सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात  आल्याची  माहिती प्रदीप नाईक यांनी दिली.

एकूण 13 प्रभागांमधून 73 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. रविवारी अर्ज मागे घेण्यासठी व पाठिंबा मिळवण्यासाठी  मोर्चेबांधणी होणार असल्याने रविवार खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. धर्मेश सगलानी यांनी दोन प्रभागांतून उमदेवारी अर्ज दाखल केले असून ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याकडे साखळीवासीयांच्या नजरा टिकून आहेत. धर्मेश सगलानी आपले पॅनल घोषित करण्याची  शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीनेही आपले उमेदवार निश्‍चित केले आहेत.

साखळी पालिका निवडणुकीत धर्मेश सगलानी आणि आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या पॅनलमध्ये चुरस असणार आहे. प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या कमी असल्याने व उमेदवार खूप असल्याने एकेक मतासाठी उमेदवारांमध्ये  चढाओढ होणार आहे हे निश्‍चित. राजकीय   प्रतिष्ठा तसेच साखळी आपल्या  ताब्यात ठेवण्यासाठी सभापती डॉ. प्रमोद  सावंत, काँग्रेसचे धर्मेश सगलानी प्रयत्नशील आहेत. साखळी पालिका निवडणुकीत विश्‍वजित राणे, प्रतापसिंह राणे यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. 

 

Tags : goa, goa news, Chain municipal elections, applications, acceptable,