Sun, May 19, 2019 12:23
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › साखळीत आज मतदान; यंत्रणा सज्ज 

साखळीत आज मतदान; यंत्रणा सज्ज 

Published On: May 06 2018 1:53AM | Last Updated: May 06 2018 1:49AMडिचोली : प्रतिनिधी 

साखळी पालिका निवडणुकीसाठी रविवारी सकाळी  आठ वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. 13 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया सुरु होणार आहे. सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली  असून सोमवारी निकाल लागणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रदीप नाईक, मधू नार्वेकर यांनी दिली.

एकूण मतदार संख्या 8112 असून पुरुष 4013 व महिला 4099 आहेत. प्रत्येक प्रभागात अंदाजे 625 च्या आसपास मतदार  आहेत. निवडणूक यंत्रणा सज्ज असून प्रत्येक केंद्रावर 5 ते 6 कर्मचारी व पोलिस नियुक्त केले आहेत. सुमारे 80 सरकारी कर्मचारी या निवडणुकीत कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता  झांट्ये  जिमखाना सभागृह वाठादेव येथे मतमोजणी  होणार आहे.  एकूण 13 टेबल्स घालून एकाचवेळी सर्व प्रभागांची मतमोजणी होणार आहे. दुपारी एकच्या दरम्यान सर्व निकाल हाती येणार आहेत, असेही नाईक यांनी सांगितले. 

एकूण तेरा प्रभागांतील लढती रंगतदार होणार असून 32 पुरुष व 23 महिला रिंगणात आहेत. प्रमोद सावंत यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली असून ते दिनरात्र  प्रचारात  गुंतलेले आहेत.आमच्या पॅनलचा विजय नक्की होणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.  धर्मेश  सगलानी,  प्रवीण  ब्लॅगन,  रियाझ खान या गटाने आपले पॅनल विजय संपादन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.