Sat, Nov 17, 2018 22:41होमपेज › Goa › विशेष मुलांच्या शाळेत मुख्यमंत्र्यांचा वाढदिन साजरा

विशेष मुलांच्या शाळेत मुख्यमंत्र्यांचा वाढदिन साजरा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:52AM

बुकमार्क करा

डिचोली : प्रतिनिधी

डिचोली   येथील  केशव सेवा साधना सचंलित नारायण झांटये विशेष मुलांच्या शाळेत आणि साखळी येथील लोकविश्‍वास प्रतिष्ठान विद्यालयात विशेष मुलांना फळांचे वाटप  करून  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.

डिचोलीत  आमदार राजेश पाटणेकर नगराध्यक्ष राजाराम गावकर भाजप गटाध्यक्ष वल्लभ साळकर विश्‍वास गावकर, अजित बर्जे, कुदंन फळारी, रामा नाईक, विनय कुमार माटेकर, अर्जून फळगावकर डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी विशेष मुलांना फळे वाटली. 

विशेष मुलांनी गीत सादर करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.  गोव्याच्या विकासात पर्रीकरांचे  महत्त्वाचे योगदान असून  गोवा आदर्श राज्य बनत असल्याचे आमदार पाटणेक यांनी सांगितले.

साखळी भाजपा मंडळ समितीतर्फे लोकविश्‍वास प्रतिष्ठान विद्यालयात सभापती प्रमोद सावंत यांच्याहस्ते विशेष मुलांना फळे वाटण्यात आली.  प्रदिप गावडे, सुभाष मळीक व  भाजप  कार्यकर्ते, शिक्षक पालक उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्याला खरी दिशा दिली असून त्यांच्या नेतृत्वाखालील देशात गोवा राज्य विकासात अग्रणी ठरले  आहे. प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी नवनवीन योजना पोहचविण्याची अंमलबजावणीचे काम पर्रीकरांनी केले आहे, असे  सभापती  डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 
डॉ. सावंत यांच्यासमवेत विशेष मुलांनी  मुख्यमंत्री पर्रीकरांना शुभेच्छा दिल्या.