Thu, Apr 25, 2019 22:04होमपेज › Goa › राज्यात नाताळ उत्साहात

राज्यात नाताळ उत्साहात

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:32AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सर्वधर्म समभावाचा संदेश देत राज्यातील ख्रिश्‍चन धर्मियांबरोबरच हिंदू धर्मियांनी सोमवारी राज्यात नाताळ सण उत्साहात साजरा केला. राज्यातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये रविवारी मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनासभांना उपस्थिती लावली होती. पर्यटकदेखील यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चसमोर स्थानिक आणि पर्यटकांनी    गर्दी केली होती. चर्चची घंटा वाजवून  प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला. यावेळी प्रार्थनासभा झाली. मध्यरात्रीची प्रार्थना तसेच नृत्याच्या कार्यक्रमानंतर सकाळी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यावर लोकांनी भर दिला. ख्रिस्ती धर्मियांनी रविवारी मध्यरात्रीनंतर  एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांसाठी दूरध्वनी, भेटकार्डे,   यासह  व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाचाही वापर झाला.

दहा हजार प्लास्टिक बाटल्यांचा ‘स्टार’

नाताळनिमित्त चित्रकार सुबोध केरकर यांनी म्युझियम ऑफ गोवा (मोग) येथे 10 हजार प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून ख्रिसमस स्टार बनवला आहे. निळ्या, हिरव्या, लाल, पिवळ्या आदी रंगछटा वापरून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या स्टारची उंची सहा मीटर आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बनवलेला हा स्टार 7 जानेवारीपर्यंत लोकांना पहायला मिळणार आहे.