Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Goa › कॅसिनो नूतनीकरण शुल्कप्रश्‍नी ‘गोल्डन ग्लोब’ला दिलासा नाही

कॅसिनो नूतनीकरण शुल्कप्रश्‍नी ‘गोल्डन ग्लोब’ला दिलासा नाही

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी  

हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लि.च्या  ‘लकी 7’ या कॅसिनोच्या  परवाना नूतनीकरणाचे शुल्क हप्त्याने भरण्याची मुभा देता येणार नाही, असे सांगून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल, गुरुवारी सुनावणीवेळी नकार दिला .

सुधारित परवाना शुल्काचा भरणा दिलेल्या मुदतीत न केल्यास   कॅसिनोला कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण सरकारच्यावतीने  सुनावणीवेळी  देण्यात आले. 

कॅसिनो परवाना नूतनीकरण शुल्कात केलेल्या दरवाढीविरोधात   ‘गोल्डन ग्लोब’कडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.   इतकी मोठी रक्‍कम एकाच वेळी भरणे शक्य नसून ती हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. हे वाढीव शुल्क हप्त्याने भरण्याची मुभा देऊन याप्रश्‍नी दिलासा द्यावा, अशी मागणी  याचिकेत करण्यात आली आहे.

कॅसिनो परवाना नूतनीकरण शुल्क भरण्यासाठी सरकारकडून  27 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली  आहे.  शुल्क न भरल्यास  सरकार काय कारवाई करणार, असे न्यायालयाने   सरकारला विचारले होते. त्यानुसार सरकारने वरील माहिती दिली. 

Tags : goa, casino, golden globe