Sat, Nov 17, 2018 17:04होमपेज › Goa › ब्राझीलच्या राजदूत रोसीमार यांना कार्निव्हलचे निमंत्रण

ब्राझीलच्या राजदूत रोसीमार यांना कार्निव्हलचे निमंत्रण

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 23 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेतर्फे यंदा 10 फेब्रवारी रोजी होणार्‍या कार्निव्हलसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलच्या राजदूत रोसीमार सुझानो यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ब्राझील येथे होणार्‍या कार्निव्हलमध्ये यंदाचा विषय ‘नमस्ते इंडिया’ ठेवण्यात आला असल्याची माहिती रोसीमार यांच्याशी झालेल्या चर्चेतून प्राप्त झाल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिली.

गोव्याचे पर्यायाने भारताचे  ब्राझीलशी असलेले द्विपक्षीय संबंध द‍ृढ करण्याच्या द‍ृष्टीने  ही चांगली संधी आहे. या निमंत्रणाद्वारे राजधानीत होणार्‍या कार्निव्हलसाठी पाहुणे या नात्याने उपस्थित राहण्यासाठी त्यांना बोलविले आहे. पुढच्या वर्षी 2019 पासून कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलचे काही फ्लोट्स गोव्यात पाठविण्यासंदर्भातही रोसीमार यांच्याशी चर्चा झाली आहे, असे फुर्तादो म्हणाले.