Mon, Apr 22, 2019 04:18होमपेज › Goa › ‘मोपा’वर कार्गो सेवा; दाबोळी विमानतळ कायम

‘मोपा’वर कार्गो सेवा; दाबोळी विमानतळ कायम

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:46PMपेडणे : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपा विमानतळ प्रकल्पाचा शिलान्यास केला नसून   राज्याच्या विकासाचा शिलान्यास केला होता. मोपा विमानतळावर कार्गो सेवा मोठ्या प्रमाणात चालू करणार असून दिलेल्या वेळेत विमानतळ पूर्ण करण्यात येईल. मोपा बरोबरच दाबोळी विमानतळही कायम राहणार आहे,  असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री  सुरेश प्रभू यांनी मोपा विमानतळाला भेट दिल्यानंतर बोलताना सांगितले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा ुखासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर,  आमदार दयानंद सोपटे, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, हरमल सरपंच अनंत गडेकर, चांदेल सरपंच संतोष मळीक, मोपा सरपंच पल्लवी राऊळ, मांद्रे सरपंच राजवी सावंत, वारखंड सरपंच प्रदीप कांबळी उपस्थित होते.

मंत्री सुरेश प्रभू  म्हणाले की, मोपा  विमानतळामुळे रोजगार निर्माण होईल.  शिवाय पर्यटन क्षेत्राला वाव मिळून महसुलात वाढ होईल, किमान तीन कोटी पर्यटक राज्यात येऊ शकतात.  स्थानिकांना  रोजगार  उपलब्ध करून दिला जाईल. दुबईमधील एका विमानतळाच्या धर्तीवर हा विमानतळ पीपीपी तत्वावर उभारला जाणारा आहे. त्या ठिकाणी लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. मोपा विमानतळ झाल्यानंतरही हजारो रोजगार निर्माण होतील. त्यासाठी लागणार्‍या  मनुष्यबळाला  प्रशिक्षण देण्याचीही योजना सुरु केली जाईल.  पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजन हब तयार केला जाईल. लोकसभेत श्रीपाद नाईक आणि राज्यसभेत विनय तेंडुलकर हे दोन्ही खासदार राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहेत. सोमवार दि. 16 रोजी दुपारी दाबोळी विमानतळावर भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याचे मंत्री प्रभू म्हणाले.आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, आजचा दिवस हा पेडणेकरांच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगा ठरणार आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्यांचा आपण ऋणी आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.   

Tags : Goa,. Cargo, service,  Mopa, Dabolim, Airport, continued