Fri, Jul 10, 2020 23:10होमपेज › Goa › आगोंद किनारी पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक

आगोंद किनारी पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 12:19AM

बुकमार्क करा
काणकोण ः प्रतिनिधी

काणकोण पोलिसांचे पथक रविवारी रात्री आगोंद किनार्‍यावर गस्तीवर असताना तेथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍या तिघाजणांनी पोलिस जीप चालकास मारहाण करून जीपची मोडतोड केली. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी आगोंद येथील तीन व्यक्तींना अटक केली. त्यांना काणकोणच्या प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.          

धवळखाजन, आगोंद येथील किनारपट्टी परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत संगीत चालू असल्याची माहिती  पोलिसांना मिळताच, त्यांनी संगीत बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गावकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.