Tue, Jun 25, 2019 21:36होमपेज › Goa › ब्रुनो आझारेदो यंदाचा ‘किंग मोमो’

ब्रुनो आझारेदो यंदाचा ‘किंग मोमो’

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 30 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या कार्निव्हल महोत्सवाचे ‘किंग मोमो’ म्हणून ब्रुनो आझारेदो (वय 57, रा. उत्तोर्डा) यांची आयोजन समितीकडून मंगळवारी निवड करण्यात आली. 

पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी, तसेच पोलिस, वाहतूक, नगरपालिकांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कार्निव्हल यंदा 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून चित्ररथ मिरवणूक पणजीत-10 रोजी, मडगाव व फोंडा-11 रोजी, वास्को व कुडचडे येथे-12 रोजी आणि म्हापसा व मोरजी- 13 रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यातील प्रत्येक केंद्राला बक्षिसाची रक्‍कम वाढवून 7.35 लाख रुपये करण्यात आली असल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.