Tue, Nov 13, 2018 03:48होमपेज › Goa › आई-वडिलांचा आदर करावा : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आई-वडिलांचा आदर करावा : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMपणजी : प्रतिनिधी

घरात सुख शांती नांदण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्यांवर प्रेम केले पाहिजे. आई-वडिलांचा आदर केला पाहिजे, तरच घरात सुख समाधान लाभते, असे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी आशीर्वचनातून सांगितले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी विद्यमान पीठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या उपस्थितीत तथा तपोभूमीच्या वेदविद्वान उपाद्यायांच्या पौरोहित्याखाली उगे सांगे येथे तुळशिदास भंडारी यांच्या दिव्यभवन नूतन  गृहप्रवेश तथा दिव्य सद्गुरू आशीर्वचन सोहळा उत्साहात झाला.

सांगेचे आमदार प्रसाद गावकर म्हणाले, की हा कार्यक्रम संगमपूर सांगेत त्रिवेणी संगमच आहे, तीन संतांच्या पावन चरणस्पर्शाने संगमपूरवासी धन्य झाले. सांगेग्रामवासीय संघटीत होण्यासाठी समाजाच्या कार्यार्थ आश्रम उभारला जाईल. 

व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वामीजींच्याहस्ते सत्कार करण्यात आला. भंडारी कुटुंबियांकडून संतांना आतिथ्यपूर्वक सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर जगदगुरू  दिलीपकुमार थंक्कपनजी - संस्थापक वर्ल्ड योग कम्युनिटी (अमेरिका), महामंडलेश्‍वर शिवानंद सरस्वतीजी ( इटली), .ब्राह्मीदेवी संचालक, सुभाष फळदेसाई, संजय परवार सरपंच, रजनीकांत नाईक - अध्यक्ष श्री हेमाडदेव सिद्धेश्‍वर देवस्थान, नित्यानंद नाईक, मधुसुदन नाईक संचालक, सुभक्षण नाईक प्रबंधक श्री दत्त पद्मनाभ पीठ आदी उपस्थित होते. भजन, आरती, दर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. दिनेश  भंडारी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन गावकर यांनी केले.