होमपेज › Goa › ध्येयप्राप्तीसाठी जिद्द महत्त्वाची

ध्येयप्राप्तीसाठी जिद्द महत्त्वाची

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:26AMहळदोणे : वार्ताहर

निश्‍चित केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे. तसेच समाजाला बळकट करण्यासाठी कायद्याची जोड हवी, असे  प्रतिपादन नगरविकास मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.

म्हापसा येथील कोमुनिदाद सभागृहात अ‍ॅड. बॅनाडिक्ट नाझारेथ यांनी जिल्हा पंचायतीच्या नियमावर  लिहिलेल्या ‘गोवा पंचायत राज कायदा 1994’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याल  मंत्री डिसोझा बोलत होते. व्यासपीठावर  अ‍ॅड.   परेश राव, अ‍ॅड. बॅनाडिक्ट नाझारेथ, आमदार ग्लेन टिकलो  उपस्थित होते.

मंत्री डिसोझा म्हणाले, की कायद्याचे पुस्तक लिहिण्यासाठी बराच अभ्यास करण्याची गरज आहे. अडॅ. बॅनाडिक्ट यांनी बरीच मेहनत व कष्ट करून हे पुस्तक लिहिले आहे. आजच्या काळातील युवापिढीला कायद्याचे ज्ञान अवगत होण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांनी या पुस्तकाचे वाचन करून आपले कायदा विषयक ज्ञान वाढवले पाहिजे.  सवार्ंनी पुस्तकाचे वाचन करून  मनन केले पाहिजे. या पुस्तकाचा फायदा वकीलांना मोठ्या प्रमाणावर होणार असून  तरूण वकीलांना आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी  या पुस्तकाचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरणार आहे.   

लेखक अ‍ॅड बॅनाडिक्ट नाझारेथ  मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की  गोवा पंचायत राज्य कायदा 1994 पुस्तक रूपाने लिहिण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रात्रंदिवस मेहनत घेऊन कायद्याचे संदर्भ गोळा करण्यासाठी बरेच दिवस लागले. पुस्तक लिहिताना कुटुंबीयाकडे देखील बरेच दुर्लक्ष झाले.  कायद्याचे पुस्तक लिहिल्यानंतर  त्यांचे संपादन करून पुस्तक रूपाने लोकांसमोर आणण्यास सखोल ज्ञानाची आवश्यकता होती.

ज्येष्ठ वकिलाबरोबर  चर्चा करुन त्यांचे  सल्ले व माहिती घेऊन  हे पुस्तक लिहिले.  पुस्तक लिहिल्यानंतर देखील ते छापण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या. मनाशी जीद्द बाळगून सर्व अडचणीवर मात करून छापून घेतले.  गोवा पंचायत राज्य कायद्याचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केल्यामुळे मनाला अत्यंत आनंद होत आहे. अ‍ॅड. सचिन देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लेखक अ‍ॅड. बॅनाडिक्ट नाझारेथ यांनी  आभार मानले.