Wed, Jan 23, 2019 17:20होमपेज › Goa › बायणा समुद्रात होडी उलटून एकाचा मृत्यू

बायणा समुद्रात होडी उलटून एकाचा मृत्यू

Published On: Jul 29 2018 1:21AM | Last Updated: Jul 28 2018 11:55PMदाबोळी : प्रतिनिधी 

बायणा येथे शनिवारी पहाटे खोल समुद्रात होडी उलटून एकाचा बुडून मृत्यू झाला. दोघांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले तर पाच जणांनी पोहून किनारा गाठला. होडी मालक परसप्पा चलवादी व मुन्‍ना नामक अशी जखमींची नावे असून वास्कोतील संजीवनी इस्पितळात त्यांच्यावर उपचार उपचार सुरू आहेत.

वास्को पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे बायणा किनार्‍यावरून परसप्पा चलवादी यांच्या मालकीच्या होडीवर  आठजण मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. त्यावेळी अचानक खवळलेल्या समुद्राची लाट या होडीवर आदळल्याने सदर होडी पाण्यात उलटून यातील आठजण पाण्यातेे फेकले गेले. प्रसंगावधान राखून या आठजणांपैकी पाचजणांनी पोहून बायणा किनारा गाठला तर दोघांना किनार्‍यावरील स्थानिकांनी जखमी अवस्थेत पाण्यातून बाहेर काढण्याले. मात्र, सूर्या मेस्ता हा युवक मृतावस्थेत सापडला. सूर्या मेस्ता याचा मृतदेह शवचिकीत्सेसाठी बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला. वास्को पोलिस पुढील तपास करीत आहेत.