Sun, Mar 24, 2019 08:42होमपेज › Goa › राज्यातील ‘स्टार्टअप्स’ना ब्लॉकचेनचा लाभ

राज्यातील ‘स्टार्टअप्स’ना ब्लॉकचेनचा लाभ

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMपणजी : प्रतिनिधी

गोवा लहान राज्य असल्याने येथे संपर्क जोडणी फार सोपी आहे. राज्यातील प्रतिभावंत लोकांसाठी आयटी क्षेत्रात अनेक नवीन धोरणे आखण्यात आली आहेत. गोव्याला आयटी हब बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याने ब्लॉकचेनचा राज्यातील स्टार्टअप्सना भरपूर फायदा होणार आहे. राज्यातील स्टार्टअप्सनी ब्लॉकचेनकडे रोजगार संधींसाठी सकारात्मक दृष्टीने पहावे, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. 

गोवा माहिती तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग आणि न्युक्‍लियस व्हिजन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मनोरंजन संस्था आणि आयनॉक्स येथे भारतातील पहिल्या ‘इंटरनॅशनल ब्लॉकचेन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर परिषदेत ‘ब्लॉकचेन अ‍ॅज ए टुल फॉर गुड गवर्हनन्स’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मंत्री खंवटे बोलत होते. 

परिषदेच्या उद्घाटनाला व्यासपीठावर राज्य मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, आयटी सचिव अमेय अभ्यंकर, गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू वरूण साहनी, सीडीएसी चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी, आयबीएम नेदरलँड ब्लॉकचेन लीड फॉर लॉजिस्टिक अ‍ॅण्ड सप्लाय चेन इंडस्ट्रीजचे फ्रान्स केम्पेन, अ‍ॅासम वेंचरचे सहसंस्थापक जेरेमी गार्डनर, सीआयआयचे अध्यक्ष राकेश मित्तल, जीसीसीआयचे अध्यक्ष संदीप भंडारे , न्युक्‍लिअस व्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक पीट्टी व  टी-हब कॉरपोरेट इनोव्हेशनचे प्रमुख रामा इयार उपस्थित होते.

मंत्री खंवटे म्हणाले, की राज्याला नवे तंत्रज्ञानाशी जोण्यासाठी हीच योग्य वेळ असून नवीन कार्यक्षमता प्रणाली रुजविण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. याला प्रतिसाद देऊन  राज्यातील स्टार्टअप्स नी ब्लॉकचेन विश्‍वात काम करण्यासाठी पुढे यायला हवे.

भारताला पुढील ब्लॉकचेनची राजधानी कशी बनविता येईल. यावर विचार करण्यासाठी प्रख्यात वक्ते व वैचारिक नेत्यांना एकत्र आणणे, हेच या परिषदेचे  मुख्य उद्दिष्ट होते. परिषदेत यावर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती , तज्ज्ञ एकत्र आले होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 65 तज्ज्ञ उपस्थित होते.