Wed, Apr 24, 2019 02:18होमपेज › Goa › बिस्मार्क तपासणी अहवाल उच्च न्यायालयात सादर

बिस्मार्क तपासणी अहवाल उच्च न्यायालयात सादर

Published On: Apr 21 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 1:14AMपणजी : प्रतिनिधी

फादर बिस्मार्क डायस यांच्या मृतदेहाची रेडिओलॉजीकल  तपासणी करण्यात आली असून तसा अहवाल गुन्हे शाखेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केला.

न्यायालयाच्या निर्देशानंतर ही रेडिओलॉजीकल तपासणी करण्यात आली. बिस्मार्क यांचा मृत्यू नोव्हेंबर 2015 मध्ये झाला होता. त्यांचा मृतदेह सांतईस्तेव येथे नदीपात्रात तरंगत्या अवस्थेत  आढळून आला होता. 

बिस्मार्क यांचा मृत्यू हा घातपातच असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी करुन सदर प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. बिस्मार्क यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. 

त्यामुळे मागील अडीच वर्षापासून तो मृतदेह गोमेकॉतील शवागृहात आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या गुन्हे शाखेने बिस्मार्क यांचा मृत्यू घातपात नसून तो नैसर्गिक असल्याचे म्हणत सदर प्रकरणाची फाईल बंद करण्यासाठी  गुन्हे शाखेने  मागणी केली होती. मात्र,  न्यायालयाने ही मागणी फेटाळून  लावली आहे. 

 

Tags ; Goa, Panaji news, Bismarck investigation, report, High Court,