Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Goa › गोव्यात आता बाईक रुग्णवाहिका 

गोव्यात आता बाईक रुग्णवाहिका 

Published On: Feb 08 2018 3:07PM | Last Updated: Feb 08 2018 2:29PMगोवा : पुढारी ऑनलाईन 

तुम्ही गोव्यात पर्यटनासाठी गेला आणि तुम्हाला अपघात झाला, इजा झाली. तर तुम्हाला तात्काळ मदत मिळणार आहे. कारण, गोवा सरकारने रुग्णांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बाईक रुग्णवाहिका ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना किंवा गरजूंना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करायचे असल्यास सर्व व्यवस्था करता येणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २० बाईक रुग्णवाहिका लॉच केल्या आहेत. गोव्यात १०८ ही सरकारी  रूग्णवाहिका पोहचू शकत नाही तिथे ही बाईक रुग्णवाहिका पोहोचणार असून, अनेक रूग्णाचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. या बाईक रुग्णवाहिकेत मुलभूत जीव वाचवणारे उपकरण, दोन ऑक्सीजन सिलेंडर यामध्ये असणार आहे.

या संदर्भात गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले, 'येत्या सहा महिन्यांत  राज्यात अशाप्रकारच्या 100 दुचाकींची रुग्णवाहिका सेवेत आणणार आहे. तर, कर्नाटक सरकारनंतर  अश्या रूग्णवाहिका सुरू करणारे गोवा हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.'