होमपेज › Goa › बँक दरोडाप्रकरणी ८ संशयिताविरूध्द खटला

बँक दरोडाप्रकरणी ८ संशयिताविरूध्द खटला

Published On: Mar 08 2018 1:50AM | Last Updated: Mar 07 2018 11:45PMम्हापसा  : प्रतिनिधी

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या  वेर्ला-काणका येथील शाखेवर 8 डिसेंबर 2017 रोजी दरोडा टाकून 11 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज पळवण्याचा प्रयत्न केलेल्या 8 संशयितांविरूध्द म्हापसा पोलिसांनी बुधवारी 311 पानी खटला म्हापसा न्यायालयात दाखल केला. एकूण 71 साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणी नोंदवण्यात येणार आहेत. या खटल्यातील संशयित राजकुमार दास,हिरालाल दास, विजय कुमार दास,अंग्रेज रवीदास,ईश्‍वरी दास,राजेश दास,सुनिल दास,विजय दास हे आहेत. यापैकी सुनिल दास,विजय दास हे अद्याप फरारी आहेत. तर राजेश दास व ईश्‍वरी दास हे दोघे बिहार पोलिसांच्या कैदेत आहेत. 

संशयितांनी दि.7 डिसेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करून नंतर हा सशस्त्र दरोडा घालण्याचा कट दोडामार्ग येथे आखला होता.