Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Goa › गोव्यात ई-सिगारेटवर बंदी घालावी

गोव्यात ई-सिगारेटवर बंदी घालावी

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 29 2018 11:28PMपणजी : प्रतिनिधी

इ सिगारेट हा प्रकार शरीराला घातक नसल्याचे सांगितले जाते. परंतु इ सिगारेटमध्ये काही प्रमाणात निकोटीन असते. देशातील अनेक राज्यांमध्ये इ सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे. गोव्यातही या सिगरेटवर बंदी घालावी, अशी मागणी कंझ्युमर वॉईसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीम सान्याल यांनी केली. 

पणजी महानगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी आयोजित चर्चेत अशीम सन्याल  बोलत होते. महापौर विठ्ठल चोपडेकर, आयुक्‍त अजित रॉय, कर्करोगतज्ज्ञ शेखर साळकर, पणजी महानगरपालिकेतील अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

अशीम सान्याल म्हणाले, की इ सिगरेट हा प्रकार अ‍ॅमेझॉनसारख्या शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. या स्मोकिंगमुळे सिगारेटचे व्यसन सुटते, असे सांगितले जाते. मात्र, हे असत्य आहे. तंबाखू हा कमी प्रमाणात असला तरी तो घातकच असतो. या सिगारेटला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने तरूणांमध्ये या सिगारेटबाबतचे खूप आकर्षण आहे. सध्या बाजारात या सिगारेटचे सुमारे सात ते आठ प्रकार उपलब्ध असून या प्रकारावर आताच बंदी  घालावी.कर्करोगतज्ज्ञ शेखर साळकर म्हणाले,की गुजरातमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे. गोव्यात मात्र तंबाखू सेवन एका टक्क्याने वाढले असून  हे खूप घातक आहे. जम्मू काश्मिर, पंजाब, महाराष्ट्र, बिहार, मिझोराम, उत्तर प्रदेश आणि केरळसारख्या राज्यात इ सिगारेटवर बंदी आहे. गोव्यातही बंदी घालावी.