Sun, May 26, 2019 18:56होमपेज › Goa › बालभवनचे संकेतस्थळ हॅक; सायबर गुन्हे विभागात तक्रार

बालभवनचे संकेतस्थळ हॅक; सायबर गुन्हे विभागात तक्रार

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 18 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

बालभवनचे  अधिकृत  संकेतस्थळ हॅक करून त्यावर आक्षेपार्ह  मजकूर  पोस्ट केल्याप्रकरणी बालभवनतर्फे गुरुवारी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करण्यात आली. बालभवनचे   प्रकल्प अधिकारी शशिकांत पुनाजी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

बालभवनच्या या अधिकृत संकेतस्थळावर 2017 मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती अपलोड केली होती. अज्ञाताने हे संकेतस्थळ हॅक करून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, सदर तक्रारीवर सायबर गुन्हे  कक्षाकडून प्राथमिक तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.