Wed, Apr 24, 2019 11:45होमपेज › Goa › भाजपचे उद्या काँग्रेसविरोधात उपोषण   

भाजपचे उद्या काँग्रेसविरोधात उपोषण   

Published On: Apr 11 2018 1:42AM | Last Updated: Apr 11 2018 1:39AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसने लोकसभेत कामकाज  न करू दिल्याने या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे तिन्ही खासदार  येत्या गुरुवारी (दि.12) येथील आझाद मैदानावर 10 ते 5 दरम्यान, उपोषण करणार आहेत. या उपोषणाला भाजपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन देणार असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी दिली. 

तानावडे म्हणाले, की प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने असहकार पुकारल्यामुळे नुकत्याच संपलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात फक्त 23 दिवसांचे कामकाज पूर्ण होऊ शकले. काँग्रेसच्या या लोकशाहीविरोधी भूमिकेचा लोकशाही मार्गाने निषेध करण्यासाठी येत्या गुरूवारी देशव्यापी  उपोषण कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक,     दक्षिण गोव्याचे भाजप खासदार  नरेंद्र सावईकर आणि राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर येथील आझाद मैदानावर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करणार आहेत. या  आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे सर्व आमदार, कार्यकर्ते तथा पदाधिकारी या उपोषणाला हजेरी लावणार आहेत. 

तानावडे म्हणाले, की 2019 साली होणार्‍या  लोकसभा निवडणुकीसाठी गोवा भाजप प्रदेशने कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शहा यांचे मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात येणार आहेत. शहा यांच्या गोव्यातील कार्यक्रमाबाबत तयारी करण्यासाठी गोवा प्रदेश राज्य कार्यकारीणीची येत्या 19 एप्रिल रोजी पणजीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे निरीक्षक पी.एल. संतोषी, प्रभारी अविनाश खन्ना तसेच संघटनमंत्री विनय पुराणिक गोव्यात येणार आहेत. या कार्यकारीणी बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी करण्यात येणार आहे. 

Tags : Goa, BJP, tomorrow, fasting, against, Congress