Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Goa › भाजपचे 13 रोजी बूथ कार्यकर्ता संमेलन

भाजपचे 13 रोजी बूथ कार्यकर्ता संमेलन

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 05 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी  

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवार 13 मे रोजी  गोवा दौर्‍यावर येत असून ते यावेळी राज्यातील 12 हजार कार्यकर्त्यांना बुथ कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संध्याकाळी  4 वाजल्यापासून  6 वाजेपर्यंत  या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील भाजपच्या  3 हजार 642 बूथचे कार्यकर्ते  सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तेंडुलकर म्हणाले, कर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 मे रोजी होणार असून तेथेदेखील भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास आहे.  कर्नाटक निवडणुकीच्या व्यग्र  वेळापत्रकातून पक्षाचे अध्यक्ष शहा  हे गोव्यात  येणार आहेत. बूथ कार्यकर्ता संमेलनात शहा हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याकडून माहितीदेखील जाणून घेतील, असे त्यांनी सांगितले.गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा गिरीश चोडणकर यांनी पदभार स्वीकारला आहे. यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. चोडणकर यांनी नुकतीच राज्यातील भाजप  सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. सदर मागणी त्यांनी कुठल्या कायद्यानुसार  व आधारावर केली  हे स्पष्ट करावे.  मागील एका वर्षात काँग्रेसने तीन प्रदेशाध्यक्ष पाहिले आहेत.  पणजी  पोटनिवडणुकीत  त्यांनी  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात  5 हजार मते घेतली याचा अर्थ ते मुख्यमंत्री होत नाहीत,  चोडणकर यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे देखील  सांगावे, असेही  तेंडुलकर म्हणाले.

Tags : Goa, BJP, convenes, booth, workers, 13th