Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Goa › लिलावापर्यंत खाणी सुरू राहण्यासाठी प्रयत्न

लिलावापर्यंत खाणी सुरू राहण्यासाठी प्रयत्न

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणबंदीग्रस्त गरीब लोकांची रोजीरोटी, रोजगार आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील खाणींचा लिलाव होईपर्यंतच्या   कालावधीत खाणी सुरू राहाव्यात, यासाठी प्रयत्नांना सरकारचे प्राधान्य असेल. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासह राज्यातील डंम्पचा ई-लिलाव करून खाण अवलंबितांना रोजगार उपलब्ध करण्याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘थिंक फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द व्हर्स्ट’ असा संदेशही त्यांनी दिला.

गडकरी म्हणाले की, खाण अवलंबितांच्या विविध गटांशी आपण मंगळवारी दिवसभर प्राथमिक चर्चा केली असून अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेणार आहे. दुसर्‍यांदा नूतनीकरण केलेल्या 88 खाणी वगळून अन्य खाणी चालू ठेवता येईल का, यावर विचार सुरू आहे. खाणींचा लिलाव होणे गरजेचे असल्याने त्यासाठी आंतरराष्ट्रीय परिमाणाचे अवलंबन केले जाणार आहे.  नैतिकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तीन सूत्रांबाबत तडजोड न करता तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.  भारत सरकार राज्य सरकारच्या मागे  असून हवे तेव्हा मदतीचा हात दिला जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आपण सर्वांनी सन्मान करणे गरजेचे आहे. कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची सरकार, आमदार-मंत्री आणि जनता या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. गोमंतकीय नेहमीच शांततेसाठी जाणले जात असून त्यांनी संयम पाळावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.