Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Goa › राज्यात सात दिवसांचा दुखवटा; आज सरकारी कार्यालयांना सुट्टी

राज्यात सात दिवसांचा दुखवटा; आज सरकारी कार्यालयांना सुट्टी

Published On: Aug 17 2018 1:44AM | Last Updated: Aug 17 2018 1:44AMपणजी : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (दि.17) सर्व सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक   संस्था तसेच सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. 

राज्य सरकारच्या अव्वल सचिव वर्षा नाईक यांनी गुरुवारी उशिरा  अधिसूचनेनुसार सर्व सरकारी संस्थांना आणि शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवण्यात आलेल्या संदेशातही सर्व राज्यांत 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत सात दिवसांचा दुखवटा पाळण्याचा आदेश दिला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहणार असून राज्यातर्फे नियोजित असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहेत.