Wed, May 22, 2019 16:22होमपेज › Goa › राष्ट्रपतींच्या सत्कारावेळी कवळेकरांना ’मुद्दाम’ डावलले

राष्ट्रपतींच्या सत्कारावेळी कवळेकरांना ’मुद्दाम’ डावलले

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 1:40AMमडगाव ः प्रतिनिधी 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांना राजशिष्टाचाराप्रमाणे  व्यासपीठावर बोलावणे गरजेचे होते. ’ात्र सरकारने मुद्दाम तंना डावलले, असा आरोप धनगर समाजाचे कार्यकर्ते नितीन पाटकर व अन्य नेत्यांनी  केला.     मु‘यमंत्री पर्रीकर यांनी या कृतीचा खुलासा करावा, अशी मागणीही तंनी केली आहे. 

धनगर समाजाच्या नेत्याला मुद्दाम अशी वागणूक देण्यात आल्याची शक्यता पाटकर यांनी व्यक्त केली. धनगर समाज या कृतीचा निषेध करत असून या विषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र पाठवून धनगर समाज आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचे नितीन पाटकर यांनी सांगितले.

बाबू कवळेकर कधीच प्रखरपणे बोलत नाहीत. त्याचा फायदा अशा प्रकारे घेतला जात आहे, असे नितीन पाटकर म्हणाले. पाटकर पुढे म्हणाले की, कवळेकर यांना व्यासपीठावर न बोलावल्यामुळे त्याचा चुकीचा संदेश गोव्यात जनतेमध्ये जात आहे. नागरी सत्कार सोहळ्याच्या वेळी कवळेकर हे प्रेक्षकामध्ये बसून होते. सरकारला जरी बाबू कवळेकर यांचा मान राखायचा हेतू नव्हता तर त्यांनी निदान त्यांच्या पदाला मान देणे गरजेचे होते. असे प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी सरकारने काळजी घ्यावी असे पाटकर म्हणाले.

मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते असताना असे कधीच घडले नाही.कवळेकर यांना व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रण दिले गेले नाही, याची सर्व धनगर समाज संघटनांना खंत वाटत आहे,असे चंद्रकांत शिंदे म्हणाले.

धनगर समाजाच्या बारा तालुक्यात बारा समित्या आहेत. या सर्व समित्यांची फोंडा येथे बैठक पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेण्याचे ठरले, अशी माहिती त्यांनी दिली.  काले पंचायतीचे पंचात सदस्य बाबू शेळके, डिचोली तालुका धनगर समाजाचे उपाध्यक्ष बाबू गवळी व इतर ावेळी उपस्थित होते. वाघा मिसाळ व इतर काही धनगर समाजाचे ज्ेष्ठ नेतेही  उपस्थित होते. ’ात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत बसण्याचे टाळले.