होमपेज › Goa › विधानसभा अधिवेशन आजपासून

विधानसभा अधिवेशन आजपासून

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:49AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी 

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारी (दि.13) आरंभ होत आहे. या अधिवेशनात विरोधी काँग्रेस पक्षाने कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामसभांचे खच्चीकरण, सरकारी योजनांची कार्यवाही, वाढते गुन्हे  आदी  मुद्यांवर राज्य सरकारला घेरणार असल्याचे जाहीर  केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही कसोटी लागणार आहे. 

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची बैठक सोमवारी पार पडली. येत्या अधिवेशनात आम्ही वास्कोतील कोळसा हाताळणी, प्रदूषण व नद्यांचे राष्ट्रीयीकरण या विषयावर पर्रीकर सरकारला जाब विचारू, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनीही भाजपच्या सर्व आमदारांची व आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना अधिवेशनाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले आहे.