Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Goa › किनारी भागांतील 146 मद्य परवाने अर्ज फे टाळले : मुख्यमंत्री पर्रीकर

किनारी भागांतील 146 मद्य परवाने अर्ज फे टाळले : मुख्यमंत्री पर्रीकर

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 1:47AMपणजी ः प्रतिनिधी

किनारी भागांतील सुमारे 146 मद्य परवान्यासाठीचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत बुधवारी प्रश्‍नोत्तर तासात दिली.हळदोणेचे आमदार ग्लेन  टिकलो  यांनी  प्रलंबित मद्य परवनान्यांबाबतच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की संबंधित खात्याकडे  मद्य परवान्यांसाठी करण्यात आलेले 146 अर्ज  फेटाळण्यात आले होते. शेतजमिनी व ऑर्चड जागेत बांधकाम करुन अर्जदारांकडून ही मद्य परवान्यासाठी अर्ज करण्यात आले होते. त्यासाठीच ते फेटाळण्यात आले. विशेष स्थितीतच एखाद्या अर्जाबाबत निर्णय घेतला जावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.