Sun, Apr 21, 2019 04:05होमपेज › Goa › खाण उद्योजक हरिष मेलवानींसह तिघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

खाण उद्योजक हरिष मेलवानींसह तिघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:08AMपणजी : प्रतिनिधी

पणजीत 19 मार्च रोजी खाण अवलंबितांच्या मार्चात सहभागी झालेले खाण व्यावसायिक हरीष मेलवानी, ट्रकमालक प्रमोद सावंत व  विनोद पेडणेकर यांनी पणजी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मेलवानी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, दि. 23  रोजी तर सावंत व पेडणेकर यांच्या जामीन अर्जावर  सोमवार दि.26 रोजी   सुनावणी होणार  आहे.

पणजीत झालेल्या मोर्चावेळी खाण अवलंबितांनी सुमारे चार तास वाहतूक अडवून दगडफेक केली होती. या दगडफेकीत पाचहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना देखील खाण आंदोलकांनी मारहाण केली होती.  परिणामी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. या मोर्चात शेकडो खाण अवलंबित सहभागी झाले होते. 

मोर्चावेळी हिंसा करणार्‍या या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचा  इशारा  सरकारने दिल्याने   मेलवानी, सावंत व पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. दरम्यान, खाण अवलंबित पुन्हा पणजीत धडकू शकतात या शक्यतेमुळे बसस्थानक परिसरात सलग तिसर्‍या दिवशी कडेकोड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात गोवा पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांचाही समावेश होता. 

Tags : Goa, Goa news with Harish Melwani,  three Application, anticipatory bail,