Wed, Apr 24, 2019 12:03होमपेज › Goa › ‘पद्मावती’ विरोधात भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘पद्मावती’ विरोधात भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:01AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविल्याने हा चित्रपट गोव्यात प्रदर्शित करू नये, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी भाजप महिला मोर्चातर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले.

अध्यक्ष सुलक्षा सावंत, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, सरचिटणीस सपना मापारी, सदस्य सचिव पूनम सामंत व अन्य पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी, या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मान्यता मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नसल्याचे सांगितले.

पद्मावती चित्रपटात महिलांची दाखवलेली प्रतिमा योग्य नाही. राणी पद्मावतीने दिलेले योगदान पूजनीय आहे. या चित्रपटात दाखविलेली आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याखेरीज हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी निवेदनात केली आहे.