Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Goa › जिल्हा खनिज निधी वापरासाठी अर्जांचे आवाहन

जिल्हा खनिज निधी वापरासाठी अर्जांचे आवाहन

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी 

जिल्हा खनिज निधीचा लाभ घेण्यासाठी खाणग्रस्तांकडून खाण खात्याने अर्ज मागवले आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी मिळून जिल्हा खनिज निधीमध्ये 180 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खाणग्रस्त भागांमध्ये विविध  30 बाबींवर जिल्हा निधी खर्च करण्याबाबत खाण खात्याने अहवाल तयार केला आहे. यात खाणग्रस्त भागात पर्यावरणाचे पुनर्रचना करणे, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, अन्य क्षेत्रात काम करणे आदींचा या तीस बाबींमध्ये समावेश आहे. या निधीचा वापर ज्येष्ठ नागरिक, महिला व बाल कल्याण व दिव्यांग व्यक्‍तींसाठी करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कृषीसाठी पुरक असलेली जमीन तयार करणे, चारा, खाणग्रस्त भागातील  शेतकर्‍यांना मदत व्हावी यादृष्टीने पशुवैद्यकीय दवाखाने उभारणे आदींचीही योजना आहे. खाण खात्याचे जिल्हा खनिज निधीची माहिती जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोचावी व त्याबाबत जागृती व्हावी, यासाठी त्याविषयी प्रसिध्दी द्यावी, असे पंचायतींना कळवले आहे. खाणग्रस्त भागातील लोकांकडून या निधीचा लाभ घेण्यासाठी खात्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हा  खनिज निधीचा वापराबाबत  उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. याबाबतची याचिका गोवा फाऊंडेशनतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

 

Tags : goa, goa news, District Mineral Fund, application,