Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Goa › पणजी ‘स्मार्ट सिटी’साठी सर्वांनी एकत्रित काम करावे

पणजी ‘स्मार्ट सिटी’साठी सर्वांनी एकत्रित काम करावे

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 22 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

पणजी शहराला  केवळ गोव्यातील नव्हे तर  देशाची स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी पणजी महापालिके (मनपा ) च्या 175 व्या वर्षपूर्तीनिमित मनपा सभागृहात  आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमावेळी टपाल खात्याकडून तयार केलेल्या  मनपाचा उल्‍लेख असलेल्या कव्हरचे  अनावरण करण्यात आले. सदर कव्हर हे टपाल खात्यात 15 रुपयात उपलब्ध असणार आहे.

डिसोझा म्हणाले, की मनपाही  आशियातील सर्वात जुनी   महानगरपालिका असून  तिची स्थापना 22 मार्च 1843 साली करण्यात आली होती. मनपाने  175 वर्ष पूर्ण केली असून हा एक ऐतिहासिक दिवस आहे. नोकरी , व्यवसाय, शिक्षणासाठी गोव्यातील वेगवेगळ्या भागातील लोक पणजीत स्थायिक झाले आहेत. 

पणजी शहर उत्कृष्ट शहर बनवण्यासाठी आणि ते केवळ गोव्यातीलच नव्हे तर देशाची स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. शहराला कचरा समस्या भेडसावत आहे.  कचरा समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. त्याचबरोबर दूरसंचार, वाहतूक आदी सर्वच क्षेत्रात काम समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. टपाल खात्याकडून जारी करण्यात आलेले मनपा नावाचे कव्हर करणे हे उत्तम पाऊल असून टपाल खात्याच्या स्पीड टपाल तसेच अन्य सेवांचा मनपाने लाभ घ्यावा, असेही त्यांनी 
सांगितले.

मनपा आपली 175 वर्ष पूर्ण करीत असतानाच  सदर कार्यक्रमावेळी मात्र,  30 पैकी 15 नगरसेवक  अनुपस्थित होते. यात माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचाही समावेश होता. गोवा आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर, मनपा आयुक्‍त अजित रॉय, महापौर विठ्ठल चोपडेकर, उपमहापौर अस्मिता केरकर, पोस्ट मास्टर जनरल विनोद कुमार,  शहर विकास सचिव सुधीर महाजन, अर्चना गोपिनाथन, पालिका प्रशासन  संचालनालयाच्या संचालक मेनका उपस्थित होते. 

Tags : goa, goa news,  Planning Minister Francis D Souza, Appeal