Tue, Nov 20, 2018 05:57होमपेज › Goa › अंजुणे, आमठाणे धरणांच्या पातळीत वाढ 

अंजुणे, आमठाणे धरणांच्या पातळीत वाढ 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:22AMडिचोली : प्रतिनिधी 

डिचोली तालुक्यात गेल्या बारा तासात 188 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसाने अंजुणे, आमठाणे  धरणांच्या  पातळीत वाढ झाली आहे. अंजुणे धरणाची पातळी 78.24 मीटर झाली आहे. धरण क्षेत्रात  गेल्या बारा तासात 165 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत या परिसरात 1502 मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती धरण अधिकारी  जी. एस. पवाडी यांनी दिली. 

आमठाणे धरणाची पातळी 47.10 मीटरवर गेली आहे.  आमठाणे धरण क्षेत्रात आतापर्यंत  1385 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिचोली तालुक्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने पुराचा धोका संध्याकाळी टळल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे अभियंता के. पी. नाईक यांनी दिली.