Sat, Apr 20, 2019 08:17होमपेज › Goa › साळवे यांच्याकडून उद्यापर्यंत फेरविचार याचिकेबाबत सल्ला :  ढवळीकर

साळवे यांच्याकडून उद्यापर्यंत फेरविचार याचिकेबाबत सल्ला :  ढवळीकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ववत  सुरू व्हावा याबाबत राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अनुभवी आणि ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांच्याकडून खाणबंदीप्रश्‍नी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबतचा सल्ला  मंगळवार, दि.3 एप्रिलपर्यंत मिळणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 

खाणबंदीच्या पार्श्‍वभूमीवर, 20 मार्च रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात येऊन सर्व खाण व्यावसायिक तसेच अवलंबित घटकांशी चर्चा केली होती. राज्य सरकारकडून याच आठवड्यात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणूगोपाल तसेच अन्य वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून व त्यांचे मत जाणून घेऊन एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले होते.

या विषयावर मंत्री ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. साळवे यांच्याकडे सरकारने संपर्क साधला असून आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुरावेही सादर केले आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास करून साळवे सोमवारी उशिरा अथवा मंगळवारपर्यंत (दि.3) आपला फेरविचारबाबत सल्ला कळवणार आहेत. त्यानंतर या सल्ल्यानुसार दिल्लीला अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तथा गोव्याचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल  आत्माराम नाडकर्णी  यांनी राज्यातील लिजक्षेत्राबाहेरील खनिज ‘डम्प’ला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लागू होत नसल्याचा सल्ला दिला आहे. तो सल्ला बरोबर असल्याचे आपल्यालाही वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीआधीच , म्हणजे 16 मार्चच्या आधी राज्यातील खाणीतून काढलेले खनिज तसेच लिजबोहरील डम्पची वाहतूक करण्याबाबतही विचार निश्‍चित व्हायला हवे. खरे तर ही बाब  सुनावणीवेळीच न्यायालयाच्या लक्षात आणून दिली पाहिजे होती, असे ढवळीकर म्हणाले.


  •