होमपेज › Goa › आंबेघाट- नेत्रावळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

आंबेघाट- नेत्रावळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMकाणकोण : प्रतिनिधी 

काणकोणात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी (दि.24) सकाळी आंबेघाट-नेत्रावळी रस्त्यावर  दरड कोसळली. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली. 

या संबंधीची कल्पना त्या भागातील नागरिकांनी काणकोण अग्निशमनदल व पोलिसांना दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. काणकोण आपत्कालीन विभागाचे प्रमुख तथा काणकोण विभागाचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोकलॅनने रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला काढून रस्ता वाहतुकीस खुला केला.  तालुक्याचे मामलतदार रघुराज फळदेसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.